अकोल्याचा यात्रेकरू अमरनाथच्या दरीत कोसळला

तोष्णेयार सिंध नदीच्या दिशेने १०० फूट दरीत कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे.

A person from Akola airlifted during amarnath yatra due to head injury and fracture
अकोल्याचा यात्रेकरू अमरनाथच्या दरीत कोसळला

नागपूर : अमरनाथ यात्रेला गेलेले अकोला जिल्ह्यातील सत्यनारायण तोष्णेयार हे खेचरासह दरीत पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना लष्कराच्या जवानांनी रुग्णालयात दाखल केले.

तोष्णेयार हे पत्नी आणि मुलीसह अमरनाथ यात्रेला गेले होते. ते खेचरावर बसून दर्शन करून परत येत असताना बारारीमार्गावर खेचराचा तोल गेला आणि तोष्णेयार सिंध नदीच्या दिशेने १०० फूट दरीत कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. भारतीय लष्कराच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत त्यांना बारारीमार्गे सैन्य दलाच्या शिबिरात हलवले, अशी माहिती संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A person from akola airlifted during amarnath yatra due to head injury and fracture asj

Next Story
नागपुरात करोनाग्रस्त कमी, सकारात्मक अहवालाचे प्रमाण जास्त; केवळ ७२६ चाचण्यांमध्ये ३१ रुग्ण 
फोटो गॅलरी