बुलढाणा : पुतण्या घरासमोर रडताना दिसला. त्याला विचारणा केल्यावर त्याने घराच्या दिशेने बोट दाखविले. त्यामुळे घरात जाऊन पाहिले असता फासाला लटकलेला भावाचा मृतदेहच दिसला. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे हा दुदैवी घटनाक्रम घडला. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आशीष वाघ (३०) हे आपल्या चुलत भावाच्या घरासमोरून जात असताना त्यांना पुतण्या रडताना दिसला. त्याची विचारपूस केल्यावर घरात जाऊन पाहिले असता नात्याने चुलत भाऊ असलेल्या प्रकाश रामदास वाघ (५९) यांचा फासाला लटकलेला मृतदेह दिसला. यामुळे धक्का बसलेल्या आशीष याने धामणगाव बढे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून ‘मर्ग’ दाखल केला. मागील दोन वर्षांपासून असलेल्या आजाराला कंटाळून प्रकाश वाघ यांनी भिंतींच्या लाकडी खुंटीला फास लावून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

हेही वाचा – देशभरातील ५१ व्याघ्र प्रकल्पांमध्ये ताडोबा १४ व्या क्रमांकावर

झोपेत असताना आई झाली बेपत्ता!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, धामणगाव बढे येथीलच अन्य घटनेत ४३ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली. संगीता सुरेश बढे (४३) असे महिलेचे नाव आहे. घटनाप्रसंगी तिचा मुलगा कुणाल (१७) हा झोपला होता. उठल्यावर पाहिले असता आई कुठेच न दिसल्याने त्याने मामाच्या मदतीने शोधाशोध केली. मात्र ती न सापडल्याने अखेर मुलाने तक्रार दिली.