नागपूर : उपराजधानीत सायकल पोलोच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आलेल्या केरळ येथील चमूतील १० वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान इंजेक्शन देताच मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हयगय केल्याने हा मृत्यू झाल्याचा रुग्णाच्या सहकाऱ्यांचा आरोप आहे. निदा फातिमा असे दगवलेल्या मुलीचे नाव आहे. ती आणि तिची चमू केरळ येथून नागपुरात नॅशनल सायकल पोलो स्पर्धेसाठी आली होती. त्यांच्या लहान मुलांच्या चमूसह सोबत ज्युनियर आणि सिनियर चमू आणि कर्मचारी असे एकूण ३२ जण केरळहून नागपुरात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फातिमाला दोन दिवसांपासून पोटदुखीसह ओकारीसारखे वाटत होते. गुरुवारी तिला ओकारी झाली. पोटदुखीही वाढली. सहकाऱ्यांनी तिला नागपुरातील श्रीकृष्ण रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर तिला एक (ओकारीशी संबंधित) इंजेक्शन दिले. त्याच्या पाच मिनिटातच तिचे हृदय बंद पडले. डॉक्टरांकडून छातीवर दाब देणे, शॉक देणे यासह सर्व उपाय केल्यावरही तिचे हृदय सुरू झाले नाही. त्यामुळे तिला मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा: ‘रियाच्या फोनचा झोलझोल, एयूची होणार पोलखोल’; सत्ताधाऱ्यांची आदित्य ठाकरेंविरुद्ध घोषणाबाजी

दरम्यान, तिच्यासोबत असलेल्या असरुद्दीन यांनी मुलगी चालत रुग्णालयात आल्यावर एक इंजेक्शन देताच तिच्या नाकातून रक्त निघून तिचा मृत्यू कसा शक्य आहे, हा प्रश्न उपस्थित केला. या मृत्यूची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. तूर्तास मुलीच्या वडिलांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. मुलीचे वडील आणि केरळ सायकल पोलो संघटनेचे काही पदाधिकारी तेथून नागपूरसाठी निघाले आहेत. दरम्यान, मुलीचा मृतदेह मेडिकलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशीच मृत्यू

नॅशनल सायकल पोलीस स्पर्धेचे गुरुवारी सकाळी दहा वाजता उद्घाटन होणार होते. परंतु, दुर्दैवाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या मुलीचा सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा: सत्ताधाऱ्यांचा सीबीआयवर विश्वास नाही का ?; अजित पवार यांचा सवाल

हृदयविकाराने मृत्यू

मुलीला दोन दिवसांपासून पोटदुखी आणि ओकारीचा त्रास होता. गुरुवारी सकाळी तिला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला गेला. तिच्या सहकाऱ्यांनी नकार दिला. तिला यावेळी एक ओकारी थांबवण्याचे इंजेक्शन दिले गेले. त्यानंतर तिला फिट्ससदृश्य झटके आले. तिचे हृदय बंद पडल्याने डॉक्टरांनी ते सुरू करण्याचे प्रयत्न केले. पण यश मिळाले नाही. डॉक्टरांनी तिच्यावर योग्य उपचार केले. नातेवाईकांचा काही गैरसमज झाला असावा. – डॉ. महेश फुलवानी, संचालक, श्रीकृष्ण हृदयालय, नागपूर</p>

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A ten year old polo player kerala died being given an injection by doctor her colleagues allege on doctor in nagpur mnb 82 tmb 01
First published on: 22-12-2022 at 17:50 IST