नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांची खाण. इथे येणाऱ्या पर्यटकाला वाघ कधी निराश होऊ देत नाही. वन्यजीव छायाचित्रकारांसाठी जणू ते तयारच असतात. इंद्रजित मडावी त्यातलेच एक. त्यांनी वाघांच्या असंख्य मुद्रा, हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. नुकतेच त्यांनी निमढेला बफर क्षेत्रात वाघाचे अख्खे कुटुंब टिपले आहे.

हेही वाचा >>>बुलढाणा: शेगाव ‘पं.स.’चे माजी उपसभापती पुंडलिक पारस्कर यांची आत्महत्या

निमढेला बफर क्षेत्रात सध्या वाघांचा मुक्त संचार आहे. वनरक्षकांची गस्त, संवर्धनासाठी त्यांची धडपड यामुळे येथील वाघांचा अधिवास अधिक समृद्ध होत आहे. ‘छोटा मटका’, ‘भानुसखिंडी’ या वाघांनी अल्पावधीतच निमढेला बफर क्षेत्राला चांगली ओळख मिळवून दिली आहे. वन्यजीवप्रेमी इंद्रजित मडावी यांनी नुकतेच निमढेला बफर क्षेत्रात ‘छोटा मटका’, ‘भानुसखिंडी’ या वाघ , वाघिणीसह त्यांच्या शावकांनाही कॅमेऱ्यात टिपले.

हेही वाचा >>>महाविकास आघाडी, युवा ग्रॅज्युएट दोन जागांवर विजयी; नागपूर विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मतविभाजनाचा फटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे संपूर्ण कुटुंब पाण्यात मनसोक्त डुंबत होते. पाण्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांच्या अधिवासात पुन्हा भटकंती सुरू केली. वाघाचे संपूर्ण कुटुंब क्वचितच एकत्र दिसून येते. इंद्रजित मडावी त्याबाबत सुदैवी ठरले.