scorecardresearch

बुलढाणा: शेगाव ‘पं.स.’चे माजी उपसभापती पुंडलिक पारस्कर यांची आत्महत्या

प्रयोगशील कष्टाळू शेतकरी व शेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती पुंडलिक पारस्कर यांनी गुरुवारी पहूरजीरा (तालुका शेगाव) येथील शेतात आत्महत्या केली.

Former Deputy Chairman of Shegaon Panchayat Samiti Pundlik Paraskar committed suicide
शेगाव ‘पं.स.’चे माजी उपसभापती पुंडलिक पारस्कर यांची आत्महत्या

प्रयोगशील कष्टाळू शेतकरी व शेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती पुंडलिक पारस्कर यांनी गुरुवारी पहूरजीरा (तालुका शेगाव) येथील शेतात आत्महत्या केली. यामुळे शेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.चेतन पारस्कर( वय ४८ राहणार मुजरा तालुका शेगाव) हे शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांना झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला.

हेही वाचा >>>भंडारा : धक्कादायक! सिरेगावटोला येथील अख्खे आदिवासी कुटुंब १६ दिवसांपासून बेपत्ता

त्यांनी भयभीत अवस्थेत शेगाव पोलिसांना याची माहिती दिली. ही वार्ता पसरताच गावकरी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अंतर्गत घटनेची नोंद केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, याला दुजोरा मिळाला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 10:21 IST

संबंधित बातम्या