चंद्रपुरात पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा

खोट्या व फसव्या घोषणांचे महामेरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या विकासाच्या घोषणांचा वाढदिवस राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केक कापून साजरा केला.

protest against pm Modi Chandrapur
(छायाचित्र – लोकसत्ता टीम)

चंद्रपूर : खोट्या व फसव्या घोषणांचे महामेरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या विकासाच्या घोषणांचा वाढदिवस राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केक कापून साजरा केला. २०१४ पासून मोदी जनतेला एप्रिल फूल बनवत आहेत, अशा घोषणाही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देण्यात आल्या.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

दरवर्षी १ एप्रिल निमित्त मोदींच्या फसव्या आश्वासनांसह खोट्या विकासाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, असा केक तरुणांच्या उपस्थितीत कापून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या विकासाच काय झालं? देशातील तरुणांच्या रोजगाराच काय झालं? वर्षाकाठी दोन कोटी नोकऱ्या देण्यात येईल, या आश्वासनाच काय झालं? पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती कमी करणार, या घोषणेचं काय झाल? प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार, या दिलेल्या आश्वासनाचं काय झाल? १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांना स्वतःचे घर मिळणार, या आश्वासनाचे काय झाले? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात येईल, या घोषणेचं काय झाल? अशा घोषणासह एप्रिल फूलच्या घोषणा देत एप्रिल फूल म्हणजेच मोदी विकासाचा वाढदिवस म्हणून आज केक कापून केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा – शरद पवार-नितीन गडकरींची भेट, भेटीमागे राजकारण…

हेही वाचा – चंद्रपूर : गुजरातमधून महाराष्ट्रात प्लास्टिक तस्करी; एम.आर. ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनवर छापा, ३२०० किलो प्लास्टिक जप्त

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, रायुकॉ शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, भोलू भैय्या काचेला, माजी सरपंच अमोल ठाकरे, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, अल्पसंख्याक अध्यक्ष नौशाद सिद्धिकी, संभा खेवले, बब्बू भाई ईसा, कुमार पॉल, ग्रा.प. सदस्य अनुकूल खन्नाडे, आदी लोक उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 16:13 IST
Next Story
चंद्रपूर : गुजरातमधून महाराष्ट्रात प्लास्टिक तस्करी; एम.आर. ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनवर छापा, ३२०० किलो प्लास्टिक जप्त
Exit mobile version