scorecardresearch

नागपूर : आई कर्करोगाने गेली, बाबा-भाऊ परगावी गेले, अन तरुणीने..

कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही तरुणी काही महिन्यांपूर्वी आई कर्करोगाने दगावल्यापासून नैराश्यात होती.

young woman suicide nagpur
नागपूर : आई कर्करोगाने गेली, बाबा-भाऊ परगावी गेले, अन तरुणीने.. (Nagpur Railway Station/file photo)

नागपूर : भाऊ-वडील मुंबईला एक काम आटोपून गोवा येथे जायला निघाले असतानाच कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही तरुणी काही महिन्यांपूर्वी आई कर्करोगाने दगावल्यापासून नैराश्यात होती.

हेही वाचा – भंडारा : “न्यायपालिकासुद्धा सरकारच्या दबावात”, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे म्हणाले, “अदानींच्या..”

हेही वाचा – गौरवास्पद ! शेतकऱ्याची मुलगी वाशीम जिल्ह्यातील पहिली महिला अग्निवीर, ‘इंडियन नेव्ही’मध्ये निवड

डार्थी उदय बोरकर (१९) रा. गणेशनगर, बोरकर काॅलनी, नागपूर असे तरुणीचे नाव आहे. तिची आई काही महिन्यांपूर्वीच कर्करोगाने दगावली. एका कामानिमित्त भाऊ व वडील गोवा येथे जाण्यासाठी निघाले होते. डार्थीला आत्याकडे सोडण्यात आले होते. तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता येथे वीज पुरवठाही खंडित असल्याचे निदर्शनात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 11:59 IST

संबंधित बातम्या