अमरावती : ‘माझ्या घरची वीज कापलीच कशी’ असा सवाल करीत एका तरूणाने महावितरणच्‍या कार्यालयात शिरून कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना येथील एमआयडीसी परिसरातील वीज केंद्रावर घडली. मारहाणीच्‍या या घटनेचा व्‍हीडिओ सध्‍या समाज माध्‍यमावर प्रसारीत झाला आहे.
राहुल राजू तिवारी (२१) असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी परिसरातील एका सदनिकेत राहणाऱ्या तिवारी कुटुंबाने पाच महिन्‍यांपासून विजेचे देयक भरले नव्‍हते. त्‍यामुळे वरिष्‍ठांच्‍या सुचनेनुसार महावितरणचे कर्मचारी मंगेश काळे हे त्‍यांचे सहकारी वैभव सावळे यांच्‍यासह तिवारी यांच्‍याकडे गेले होते. त्‍यावेळी घरी असलेल्‍या महिलेने घरी कुणी नाही, त्‍यामुळे आता वीज कापू नका, असे त्‍यांना सांगितले. पण, वरिष्‍ठांच्‍या आदेशामुळे आपल्‍याला वीज कापावी लागेल, असे सांगून मंगेश काळे यांनी तिवारी यांच्‍या घरातील वीज पुरवठा ख‍ंडित केला.

‘माझ्या घरची वीज कापलीच कशी’ असा सवाल करीत एका तरूणाने महावितरणच्‍या कार्यालयात शिरून कर्मचाऱ्याला मारहाण केली.

हेही वाचा >>>अमरावती : लग्नावरून परतणाऱ्या दोन वाहनांना दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी मार्गावर भीषण अपघात; ५ ठार, 7 जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्‍यानंतर ते कार्यालयात परतले. काही वेळाने राहुल तिवारी याने मंगेश काळे यांना मोबाईलवर संपर्क साधून धमकी दिली, आणि तो थेट महावितरणच्‍या कार्यालयात पोहचला. त्‍याने शिवीगाळ करीत मंगेश काळे यांना मारहाण सुरू केली. राहुल तिवारी याच्‍या विरोधात राजापेठ पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. या मारहाणीचा व्‍हीडिओ समाज माध्‍यमांवर प्रसारीत झाला आहे.