मेहकर येथून खामगावकडे जाणाऱ्या एसटी बसला झालेल्या अपघातात चालक वाहकासह किमान पंचवीस प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये बुलढाण्यासह अकोला व वाशीम जिल्ह्यातील राहिवाशांचा समावेश असून, त्यांना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज शनिवारी ( दि. ४) दुपारी दीड वाजताच्या सुमारास खामगाव आगाराची (एम एच -एन ८२८९ क्रमाकाची) बस सुकाणूमधील (स्टेअरिंग) बिघाडामुळे मार्गानजीकच्या झाडाला धडकली. मेहकर खामगाव मार्गावरील पाथर्डी घाटात हा अपघात झाला. जखमी प्रवाशांची संख्या जास्त असल्याने काही काळ गदारोळ उडाला. घटनास्थळी जानेफळचे ठाणेदार राहुल बोंदे व सहकाऱ्यांनी भेट देऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.
अपघातात चालक विवेक काळे, वाहक बाळू गव्हाणे यांनाही दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा – बुलढाणा : विदर्भात भाजपला उतरती कळा, जनतेचे ‘पन्नास खोके’ला प्रत्युत्तर; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

हेही वाचा – व्वा! चवदार, रुचकर, लज्जतदार; वर्ध्यातील मराठी साहित्य संमेलनातील भोजनामुळे साहित्यरसिक तृप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपशील पुढीलप्रमाणे आहे. कांताबाई अवचार वय ६२ वर्ष रा. कोटा शिरपूर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम, सुरेश जनार्दन खराटे वय २७ वर्ष रा. जोगेश्वरी तालुका रिसोड जिल्हा वाशिम, प्रयागबाई जनार्दन खराटे वय ६० वर्ष राहणार जोगेश्वर तालुका रिसोड, शेख यासीन शेख खुबन वय ७० वर्ष राहणार नवघरे मंगरूळ ता. चिखली, अब्दुल रशीद अब्दुल कादिर वय ७२ वर्ष राहणार बाळापूर जिल्हा अकोला, मनोरमा गबाजी मिसाळ वय ६५ वर्ष राहणार मलकापूर पांगरा तालुका सिनखेडराजा, रोहिणी घनश्याम जाधव वय १५ वर्षे राहणार पाथर्डी तालुका मेहकर, ऋतुजा जीवन जाधव वय १५ वर्षे, शंकर रामा कांबळे वय ७५ वर्ष रा. मारुती पेठ तालुका मेहकर, सीताराम नानू चव्हाण वय ७५ वर्ष राहणार शिर्ला नेमाने ता खामगाव, प्रीती बुढन मार्कंड वय १४ वर्ष राहणार लाखनवाडा, भावेश मूलचंद राठोड वय १६ वर्ष रा. पाथर्डी, हरिभाऊ त्रंबक सोळंके वय ६५ वर्ष रा. पारखेड फाटा, अनुसया हरिभाऊ सोळंके वय ५५ वर्ष रा. पारखेड फाटा, कविता गोपाल एकनाथ वय १९ वर्ष, अमित घनश्याम जाधव वय १६ वर्ष रा. पाथर्डी, स्नेहा केवलसिंग चव्हाण वय १६ वर्ष रा. पारखेड, किरण मुरलीधर राठोड वय १८ वर्ष रा. पारखेड, अश्विनी कैलास राठोड १६ वर्ष रा. पाथर्डी, रेखा प्रकाश चव्हाण १६ वर्ष पारखेड, वेदिका सुरेश जाधव १६ वर्ष पारखेड, कोमल रोहिदास राठोड वय १६ वर्ष पारखेड, राणी नवलचंद जाधव १६ वर्ष पारखेड, सोनू संतोष जाधव वय १६ वर्ष. दरम्यान, घटनास्थळी एसटी महामंडळाचे कार्यशाळा अधीक्षक हर्षल साबळे, खामगाव आगार व्यवस्थापक रणवीर कोळते, तसेच प्रवीण तांगडे, संजय मापारी, अंकित शिंदे यांनी भेट देऊन बसची पाहणी केली.