यवतमाळ : अवैधरीत्या हातभट्टी दारू गाळप करून विक्री करणाऱ्या कुख्यात आरोपीविरुद्ध ‘एमपीडीए’चा आदेश पारीत होताच आरोपीला अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने यवतमाळच्या इतिहासात या प्रकारची केलेली ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जाते.

अमर राजू दातार (३५, रा. राणी अमरावती, ता. बाभूळगाव), असे एमपीडीएअंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अवैध हातभट्टी दारू गाळप करून विक्री करण्याचा व्यवसाय अनेक वर्षापासून करत आहे. यापूर्वी त्याचा हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करून गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत. तरीही तो हातभट्टी दारू गाळप करून विक्री करतच होता.

हेही वाचा – नववर्षातील हुडदंग थांबवण्यासाठी नागपुरात २ हजार पोलिसांचा बंदोबस्त; मद्यपींना आवरण्यासाठी ‘ही’ योजना

हातभट्टी दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाच्या वतीने जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे एमपीडीएचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जिल्हादंडाधिकारी डॉ. पकंज आशिया यांनी आदेश पारीत करताच अमर दातार याला अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नीतेश शेंडे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाने केली.

हेही वाचा – वर्धा : बड्या कुटुंबातील व्यक्तीस दिल्लीच्या ठगांनी दिला झटका; बियाण्यात फसवणूक…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर महिन्यात अवैध दारूसंदर्भात ११५ गुन्हे दाखल केले व १२२ आरोपींविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ११ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कलम ९३ अंतर्गत सहा आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक गुन्हे नोंदविण्यात आले. दोघांवर उल्लंघनाची कारवाई करण्यात आली आहे.