वर्धा : माझ्या मागण्या मान्य झाल्या असून राजकीय वेगळी भूमिका काहीच नसल्याचे उत्तर भाजप आमदार केचे यांनी दिले आहे.निधी परत घेण्याची बाबच नव्हती. कार्यादेश निघालेला निधी परत घेण्याचा प्रश्नच नाही.आता आष्टी व आर्वी साठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीत निधी मंजूर केल्याचे केचे म्हणाले. अखेर हे चहाच्या पेल्यातील वादळ ठरल्याचे चित्र आहे.

पालकमंत्री फडणवीस यांनी मला न विचारता निधी कसा दिला,असा थेट सवाल केचे यांनी पत्रातून केला होता.फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांनीच हा निधी आणल्याचे स्पष्ट झाल्यावर केचे नाराज झाले होते. मात्र असे काही नसल्याचे ते आता सांगतात.ते म्हणाले, फडणवीस यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दोघांनीच भोजनाच्या टेबलावर चर्चा केली.

हेही वाचा >>>नागपूर मेट्रोची सूत्रे आता मुंबईतून हलणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझा काहीही राग लोभ नाही,असा निर्वाळा केचे यांनी दिला.सुमित वानखेडे यांचे काय,असा प्रश्न केल्यावर त्याबाबत तसे काही नसल्याचे ते म्हणाले.एकूण तूर्तास हा वाद निकालात काढण्यात एकमत झाल्याचे दिसून येते.