चंद्रपूर: रानडुक्करने दुचाकीला दिलेल्या धडकेत कृषी अधिकारी संजीव उर्फ़ गुड्डू दमके यांचा मृत्यू झाला. सावली येथील रहिवासी संजीव उर्फ़ गुड्डू दमके हे कृषी विभाग सिंदेवाही येथे कृषी सहायक पदावर कार्यरत होते. मंगळवारी रात्री कार्यालयातील कामे आटोपून सावली कडे येत असतानाच पेंढरी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला रानडुक्करने जोरदार धडक दिली त्यात ते बाजूला फेकले गेले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघात झाल्यानंतर काही वेळात माहिती मिळताच पेंढरी येथील पत्रकार लखन मेश्राम यांनी घटनास्थळी धाव घेत बघितले असता त्यांना जखमी दमके यांची ओळख पटली व त्यांनी या बाबत पोलिसांना व घरी माहिती दिली. त्यानंतर जखमी दमके यांना सावली येथे आणण्यात आले व नंतर चंद्रपूर येथे भरती करण्यात आले.

हेही वाचा… नागपूर : भिडेंविरुद्ध सीताबर्डी पोलिसात राष्ट्रवादीची तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावलीत शोककळा परसली असून युवा अधिकाऱ्याच्या मृत्यूमुळे दुःख व्यक्त केल्या जात आहे. संजीव दमके यांचा मागे आई,पत्नी,मुले, बहीण असा बराच मोठा आप्त परिवार आहे. बुधवारी दुपारी सावली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.