चंद्रपूर : महाविद्यालयीन तरुणाईच्या जल्लोषपूर्ण वातावरणात निर्माता, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता सयाजी शिंदे, आकाश ठोसर व अभिनेत्री सायली राऊत यांनी ‘घर बंदूक बिर्याणी’ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन केले. या मराठी चित्रपटाला तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी मंचावर अभिनेता आकाश ठोसर व अभिनेत्री सायली राऊत यांनी नृत्य केले. त्यांच्यासोबत विद्यार्थीदेखील थिरकले.

हेही वाचा – ‘आयपीएस’ होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने गुन्हेगारीकडे वळून बनला तोतया अधिकारी!

हेही वाचा – विदर्भात पुन्हा विजांचा कडकडाट, ७ शेतमजूर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मंजुळे व त्यांची संपूर्ण चमू आज चंद्रपुरात आली होती. सरदार पटेल महाविद्यालयात या सर्वांचे आगमन झाले. तिथे आमदार किशोर जोरगेवार, प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, संस्थेचे सहसचिव डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सर्वांचे स्वागत केले. एफईएस गर्ल्स महाविद्यालय तथा हायस्कूलमध्येही ही चमू पोहोचली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानीही त्यांनी भेट दिली. यावेळी नागराज मंजुळे यांच्यासह सर्व कलावंतांनी अम्मा अर्थात आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री यांचा आशीर्वाद घेतला. सायंकाळी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात संगीत ऑर्केस्ट्रा तसेच चांदा क्लब ग्राउंड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.