धनवटे रंगमंदिराची पुन्हा उभारणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कवीवर्य सुरेश भट स्मृती सभागृहानंतर आता विदर्भ साहित्य संघाच्या धनवटे रंगमंदिराची पुन्हा उभारणी आणि नागपुरात भव्य एम्फी थिएटर (खुला रंगमंच) उभारणीचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विदर्भ साहित्य संघाचे धनवटे रंग मंदिर नागपूरच्या कलासंस्कृतीचे वैभव होते. अनेक कलावंत येथून घडले. हे सभागृह तोडल्यावर नव्या संकुलातील सभागृहाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यात काही तांत्रिक अडचणी आहे. त्या दूर करून सभागृहाचे काम लवकर पूर्ण केले जाईल तसेच न्यायालयाच्या निर्देशानंतर यशवंत स्टेडियम आणि कस्तूरचंद पार्क कार्यक्रमासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे १० ते १५ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था होईल, असे भव्य एम्फी थिएटर (खुला रंगमंच) बांधण्याचा विचार असून त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार पुढाकार घेईल, असे फडणवीस म्हणाले.

सुरेश भट सभागृह सांस्कृतिक जीवनाला प्रगल्भ करणारे आहे. या सभागृहात हौशी कलावंतांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना कार्यक्रम करण्याची संधी मिळावी यासाठी सभागृहाचे पाच हजार रुपयापेक्षा जास्त भाडे असू नये. कमीत कमी भाडे ठेवले तर सांस्कृतिक वैभव वाढेल आणि कलावंतांच्या गुणांना वाव मिळेल, असेही गडकरी म्हणाले.

देशातील कुठल्याही महापालिकेने निर्माण केले नसेल, अशा सभागृहाची निर्मिती नागपूर महापालिकेने केली. सुरेश भट यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आहे. या सभागृहामुळे नागपुरात चांगली नाटके रसिकांना बघायला मिळतील. सुरेश भट यांनी मराठीमध्ये दर्जेदार काव्य निर्मिती करून नवीन आयाम दिला आहे. केवळ महाराष्ट्रात नाही देशात त्यांनी मराठी भाषा समृद्ध केली. त्यांचा मोठा चाहता वर्ग देशभरात निर्माण झाला असल्याचे फडणवीस म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amphitheater devendra fadnavis ram nath kovind nagpur tour
First published on: 23-09-2017 at 03:30 IST