अमरावती : मध्य रेल्वेने अमरावती व पुणे या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या द्वि साप्ताहिक विशेष रेल्वेला मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम विदर्भातून पुणे येथे नोकरी-व्‍यवसायाच्‍या निमित्‍ताने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्‍या मोठी असून त्‍यांची मोठी सोय झाली आहे.

हेही वाचा – बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य घेण्यास नकार, शिक्षणसंस्था चालकांची टोकाची भूमिका

One way special train between Mumbai and Nagpur
मुंबई आणि नागपूर दरम्यान एकेरी विशेष रेल्वेगाडी
mumbai, Western Railway , Extend Harbor Line up to Borivali, Expected in Three Years, Completion Expected in Three Years , Harbor Line western railway,
पुढील तीन वर्षात हार्बर मार्गावरून थेट बोरिवलीपर्यंत प्रवास, रेल्वे प्रशासनाकडून कामे हाती
Indian Railway completes 171 years Boribandar to Thane local ran on 16 April 1853
भारतीय रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण! १६ एप्रिल १८५३ रोजी धावली बोरीबंदर ते ठाणे लोकल
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द

हेही वाचा – धक्कादायक! चक्क विद्यार्थी करताहेत मराठा सर्वेक्षण, शिक्षकांनी लावले कामाला; नेमका कुठे घडला हा प्रकार? वाचा…

आधी ही रेल्‍वेगाडी २८ जानेवारीपर्यंत अधिसूचित होती. गाडी क्र. ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस २ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी व रविवारी पुणे स्थानकावरून रात्री २२:५० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १७:३० वाजता अमरावती स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०१४४० अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस ३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत शनिवार व सोमवारी अमरावती स्थानकावरून १९:५० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १६:२० वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाने दिली आहे.