भंडारा : ऐन दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना सर्वेक्षण सुरू झाल्याने काही शाळांमध्ये बारावी आणि दहावीच्या सराव परीक्षांवर याचा परिणाम झाला आहे. अशातच आता मराठा सर्वेक्षणासाठी शिक्षकांनी चक्क विद्यार्थ्यांना कामाला लावल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. या शिक्षकांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचं काम जोरात सुरू आहे. शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. शिक्षकांवर या कामाचा अतिरिक्त भार आल्याने त्यांनी हा भार विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टाकल्याची धक्कादायक घटना लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील असून या प्रकरणी मेंढे शिक्षकाचे नाव समोर आले असून शिक्षक आपल्या कामासाठी विद्यार्थ्यांना गावात फिरवत असल्याचा व्हिडीओ प्रसारित होत आहे. या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांना विचारले असताना त्यांनी शिक्षणाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तर योग्य चौकशी करुन कारवाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?

हेही वाचा – राज्यात थंडीचा मुक्काम वाढला

सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी मराठा व खुल्या प्रवर्गाची महत्त्वपूर्ण माहिती संकलित करण्यासाठी प्रगणक म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र काही शिक्षक या कामात हलगर्जीपणा करीत आहेत. प्रगणक असलेले शिक्षक या महत्त्वपूर्ण नोंदी करण्यासाठी आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांचा उपयोग करीत आहेत. यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठा नोंदणी सर्वेक्षणाला शाळेतील विद्यार्थ्यांचा उपयोग केला जात असल्याने शिक्षण सोडून विद्यार्थी वर्गाबाहेर सर्वेक्षण करीत फिरत असल्याचे दिसत आहे.

या प्रकारामुळे सर्वेक्षणाची माहिती व्यवस्थित संकलित होत आहे ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोंडेगावातील या प्रकारामुळे सुरू असलेल्या सर्वेक्षणाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सर्वेक्षणासाठी संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या विश्वसनीयतेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचा धसका घेत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळावे व कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे, यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. राज्यात मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी जबाबदार व्यक्ती असलेल्या शिक्षकांना प्रगणक म्हणून घरोघरी जाऊन सर्वेक्षणाच्या नोंदी घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत मराठा व खुल्या वर्गातील व्यक्ती, त्यांच्या कुटुंबाची विस्तृत माहिती गोळा करायची आहे. मागासवर्गाशी संबंधित व्यक्तींची फक्त नोंद करायची आहे. मराठा व खुल्या प्रवर्गातील व्यक्तींकडून १५४ प्रश्नांची उत्तरे घ्यायची आहेत. याशिवायही इतर काही माहिती प्रगणकांना गोळा करायची आहे.

हेही वाचा – मुनिया संवर्धन राखीव क्षेत्रात कोळ्याच्या तब्बल ४६ प्रजाती

विधवा महिलांना शुभकार्यात बोलावले जाते का ? सर्वेक्षणात बुचकाळ्यात टाकणारे प्रश्न

सर्वेक्षणातील अनेक शिक्षक प्रामाणिकपणे या नोंदी घेत आहेत. मात्र काही शिक्षण ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सोबत घेऊन फिरत आहेत. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक आणि पेन देण्यात येत आहे. या पुस्तकात नोंदणी केली जात आहे. त्यानंतर ती अ‍ॅपमध्ये भरली जात आहे. लाखनी तालुक्यातील व्हायरल झालेल्या शिक्षकांचा व्हिडीओ सध्या जिल्ह्यात गाजत आहे. विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती समजली नाही किंवा चुकीची ऐकू आल्याने तसे लिहिले जाईल. स्वाभाविकच त्यातून सर्वेक्षणात चूक शक्य आहे. परिणामी अशा महत्त्वपूर्ण नोंदी गोळा करताना विद्यार्थ्यांचा वापर करणे शिक्षक योग्य आहे का? हा प्रश्न यातून निर्माण होत आहे. दुसरीकडे चौकशी होऊन अशा शिक्षकांवर कारवाई होईलही मात्र त्यांनी आतापर्यंत केलेले सर्वेक्षण योग्य आहे की नाही? हे बारकाईने तपासण्याची गरजही निर्माण झाली आहे.