नागपूर : Kuno national park cheetah मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एक चित्ता जंगलात सोडण्यात आला. त्यांची संख्या आता एकूण सात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या तीन ते चार वर्षे वयोगटातील ‘नीरवा’ या मादी चित्त्याला रविवारी सायंकाळी कुनोतील एका मोठ्या खुल्या पिंजऱ्यातून जंगलात सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत जंगलात सोडण्यात आलेल्या चित्त्यांची संख्या सात झाली आहे. तर अजूनही दहा मोठे चित्ते पिंजऱ्यात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उर्वरित चित्त्यांना जंगलात सोडण्याचा निर्णय केंद्राने नुकत्याच स्थापन केलेल्या सुकाणू समितीवर सोपवण्यात आला आहे. उद्या, मंगळवारी या समितीचे सदस्य कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देणार आहेत. नामिबियाहून आठ चित्ते (पाच मादी आणि तीन नर) १७ सप्टेंबर २०२२ला तर दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते (सात नर आणि पाच मादी) १८ फेब्रुवारी २०२३ला आणण्यात आले. यापैकी नामिबियाहून आणलेल्या ‘ज्वाला’ या मादी चित्त्याने मार्चमध्ये कुनो राष्ट्रीय उद्यानात चार बछड्यांना जन्म दिला. ज्यापैकी तीन बछड्यांचा नुकताच मृत्यू झाला. तर दक्षिण आफ्रिका व नामिबियाहून आणलेल्या २० चित्त्यांपैकी साशा, उदय आणि दक्षा या तीन चित्त्यांचाही कुनोत मृत्यू झाला. ‘साशा’ किडनीच्या आजाराने, २७ मार्चला, ‘उदय’ हृदय बंद पडल्याने १३ एप्रिलला तर ‘दक्षा’ या मादी चित्त्याचा नऊ मे रोजी इतर चित्त्यांची मिलनादरम्यान मृत्यू झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another cheetah in the forest of madhya pradesh kuno national park rgc 76 ysh
First published on: 29-05-2023 at 15:06 IST