वर्धा : पोलीस असल्याची बतावणी करीत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेशात लुटमार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. इम्रान परवेज जाफरी, बिदर व तमस विजय सूर्यवंशी अशी आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यातील देवळी, सेलू, सावंगी, हिंगणघाट, रामटेक, उमरेड, काटोल तसेच अन्य दोन राज्यांत लुटमार केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

हेही वाचा – गोंडवाना विद्यापीठातील सहायक प्राध्यापक निवड यादीवरून वाद! भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित

हेही वाचा – मेडिकल-मेयो मृत्यू प्रकरण : वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी माहिती मागितली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी आपल्या दुचाकीवर महामार्गावर भटकंती करीत. वाटेतील प्रामुख्याने वृद्धांना अडवून पैसे, दागिणे लुटून नेत होते. त्यासाठी पोलीस असल्याचा धाक दाखवून वाहने थांबवित होते. वाहन तसेच अन्य मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. समुद्रपूरजवळ कणकडी शिवारात लुटमार करण्याचा प्रयत्न करीत असताना पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी ही कारवाई केली.