गोंदिया : ज्या काँग्रेस पक्षाच्या नावावर तुम्ही, तुमच्या कुटुंबाने राजयोग भोगलं, ज्या काँग्रेस पक्षात राहून पैसे कमावले, मोठी पदे भूषविली, अशी काँग्रेस नावाच्या आईने तुम्हाला मोठं केलं त्याच आईची तुम्ही बदनामी करता, याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. तुमच्या या कृतीबद्दल लोकं तुम्हाला माफ करणार नाही. एकंदरीतच अशोक चव्हाण यांचा महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाला संपविण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज मंगळवारी गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचाराला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना केले.

हेही वाचा – रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ

हेही वाचा – “महायुती भ्रष्ट उमेदवार देणार की नवीन चेहरा देणार?”, भावना गवळींच्या उमेदवारीवर आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डाॅ. प्रकाश आंबेडकरबद्दल बोलताना पटोले म्हणाले, की समविचारी मतांचे विभाजन टळावे याकरिता आमचा त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यातच काँग्रेस पक्षाला तुमच्या सात जागा सांगा त्यावर आम्ही वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहीर करतो या आशयाचे पत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नावे पाठवून आमची चेष्टा करायची आणि इतर ठिकाणी आमच्याविरुद्ध वंचितचे उमेदवार जाहीर केल्यामुळेच काँग्रेस पक्षाने अकोल्यात उमेदवार दिला आहे. तुम्हालाच गरज नाही तर त्याला काँग्रेस पक्ष तरी काय करणार, असेही पटोले या प्रसंगी म्हणाले.