scorecardresearch

गडचिरोली: एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांचा हैदोस; बांधकामावरील वाहने जाळली

दरम्यान पोलीस सतर्क झाल्याने नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले.

गडचिरोली: एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांचा हैदोस; बांधकामावरील वाहने जाळली
गडचिरोली : एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांचा हैदोस; बांधकामावरील वाहने जाळली

एटापल्ली तालुक्यातील गट्टा ते गट्टागुडा मार्गावर पुलाच्या बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याने त्या भागात दहशतीचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. काही काळ शांत असलेल्या नक्षलवाद्यांनी दक्षिण गडचिरोली भागात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गुरुवारी भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथील गाव पाटलाची हत्या केल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यात जाळपोळ केली.

गट्टा ते गट्टागुडा मार्गावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी असलेल्या वाहनांची नक्षल्यांनी रात्री १०च्या सुमारास जाळपोळ केली. यात मिक्सर मशीनचा समावेश आहे, तर काही वाहनांची तोडफोड केली. दरम्यान पोलीस सतर्क झाल्याने नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले. हा परिसर अतिसंवेदनशील आहे. गेल्या वर्षभरापासून नक्षलवाद्यांच्या कारवाया कमी झाल्या होत्या. परंतु महिनाभरापासून नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाले असून प्रशासनाला धमकी देण्यासाठी पत्रकबाजीसारखे प्रकार दिसून येत आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा सावध झाली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 13:30 IST

संबंधित बातम्या