अमरावती : सध्याचे युग मोबाईलचे आहे. मोबाईलद्वारेच बहुतांश आर्थिक व्‍यवहार होत असल्‍याने जादा रोख रक्कम सहसा कोणी जवळ बाळगत नाही. रेल्वेत प्रवास करताना मात्र रोख रक्कमेची गरज भासते. अनेक रेल्वे प्रवाशांकडे रोख रक्कम नसल्याने त्यांची गैरसोय होते. यामुळे रेल्वे प्रशासनाने बडनेरा, अकोला, शेगावसह मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागातील १३ रेल्वे स्थानकांवर ‘एटीएम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हिताची सर्व्हिसेस लि. या कंपनीसोबत रेल्‍वेने या सेवेसाठी ५ वर्षांचा करार केला आहे.

हेही वाचा – जवानांच्या बलिदानाची गाथा यावर्षी सातवीच्या पुस्तकात; विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजविण्याचा हेतू

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
1878 summer special trains from Western Railway and 488 from Central Railway
पश्चिम रेल्वेवरून १,८७८ आणि मध्य रेल्वेवरून ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
Mumbai Municipal Corporation, bmc, Railway Officials, Conduct Joint Inspection, railway and bmc Joint Inspection, Prevent Monsoon Waterlogging, waterloggig on train track, waterlogging on mumbai road,
रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून खबरदारी, पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी
CSMT station, toilets, passengers at CSMT,
सीएसएमटी स्थानकात प्रवाशांचे हाल, अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे पुरुष महिलांची कुचंबणा

हेही वाचा – इंडिया आघाडीला विरोधी पक्षनेता बनवता येईल एवढ्या जागा मिळणार नाही, बावनकुळे असे का म्हणाले?

शेगाव, अकोला, मलकापूर, पाचोरा, बडनेरा, नाशिक, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, निफाड, देवळाली, लासलगाव आणि खंडवा या स्‍थानकांवर ‘एटीएम’ची सुविधा उपलब्‍ध होणार आहे. यातून रेल्वेला ११.४१ लाख रुपयांचा महसूलही मिळणार आहे. प्रवाशांना अचानक रोख रकमेची गरज भासल्यास गैरसोय होते. रेल्वे प्रवासात अनेकवेळा ऑनलाइन पैसे देताना अडचणी येतात. त्यामुळे रोख रकमेची गरज पडते. यासाठी प्रवाशांकडून एटीएमचा शोध घेतला जातो. प्रामुख्याने तिकीट खिडकीचा परिसर, प्रवेशद्वार, जनरल वेटिंग हॉल या भागात एटीएम लावण्यावर भर असणार आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरही एटीएममधून पैसे काढून गरज भागविता येणार आहे.