लोकसत्ता टीम

वर्धा: एखाद्या रोगाची साथ पसरली की त्यावर अंकुश ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न प्रशासनाकडून युद्ध पातळीवार केल्या जातो. तसेच पाळीव जनावरंबाबतही दक्षता घेऊन आवश्यक ते उपाय योजल्या जातात. मात्र इथे रोज दहा डुकरांचा मृत्यू होत असून त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाल्याचे चित्र आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यावर स्थानिक प्रशासन सतर्क होणे अपेक्षित आहे. मात्र कुठेही खबरदारीचे उपाय घेतल्या गेल्याचे दिसून येत नाही.

प्रामुख्याने वर्धा शहरालगत व श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नालवाडीत डुकरांचा मृत्यू होत आहे.१ ते २७ एप्रिल दरम्यान १५८ डुकरे मेलीत. मृत डुकरे उचलून त्याची विल्हेवाट लावण्यापोटी ग्रामपंचायतने आता पर्यंत १ लाख ६२ हजार रुपये खर्च केला. पण यामुळे स्थानिक नागरिकांना बाधा होवू नये म्हणून अद्याप कसलेच प्रतिबंधक उपाय केल्या गेलेले नाहीत. ग्रामसेवक रामेश्वर चव्हाण म्हणाले की कशामुळे डुकरं मरत आहे हे अद्याप कळले नाही. वरिष्ठ पातळीवरून काही सूचना नसल्याचे ते म्हणाले. माजी सरपंच बाळाभाऊ माउस्कर यांनी ही गंभीर बाब असल्याचे नमूद करीत त्वरित उपाययोजना आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

आणखी वाचा-पश्चिम विदर्भात जलसंकट, ६.२४ टक्के साठा कमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पशु संवर्धन खात्याने हा आफ्रिकन स्वाईन फिवर असू शकण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र अद्याप अधिकृत सूचना मिळाली नसल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. असाच प्रकार सातोडा, पिपरी परिसरात होत असल्याचे सांगण्यात आले. ही साथ पसरलेला परिसर प्रतिबंधक परिसर म्हणून घोषित होणे त्वरित आवश्यक आहे.एक किलोमीटर परिसरात निर्जनतुकीकरण होणे आवश्यक आहे. मोकाट पद्धतीने होणारे वराहपालन टाळावे. वाराह पालन केंद्रातील कचरा त्वरित नष्ट करणे असे व अन्य उपाय योजने आवश्यक असल्याची चिंता नागरिक व्यक्त करतात.