बुलढाणा : मोताळा नांदुरा मार्गावरील शेंबा ( तालुका नांदुरा ) येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम अज्ञात टोळीने फोडल्याने पोलीस विभागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडून तेरा लाख बावीस हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज, रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

सुरक्षा यंत्रणेमुळे (अलर्ट अलार्म) बोराखेडी पोलीस अवघ्या पंधरा मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. चोरांच्या टोळीने वापरलेल्या कार चा पोलिसांनी पाठलाग केला. मात्र कार चा वेग जास्त असल्याने चोरटे पसार होण्यात सफल झाले.ते खैरा- नांदुरा च्या दिशेने पसार झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…नागपुरात भगर, शिंगाडा पिठाचे पदार्थ खाताच सव्वाशे नागरिकांना विषबाधा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेंबा येथील मुख्य रस्त्यावर महाबँकेचे एटीएम आहे. प्रथम दर्शनी अंदाजानुसार ‘गॅस कटर’च्या सहाय्याने एटीएम फोडून त्यातील मोठी रक्कम घेऊन चोरांची टोळी पसार झाली. एटीएम संबधित सुरक्षा यंत्रणा (सिक्युरिटी अलर्ट) मुळे पोलिसांना एटीएम फोडल्याची माहिती मिळाली.