scorecardresearch

Premium

धावत्या रेल्वेगाडीत प्रसूतीकळा, अखेर स्थानकावर बाळाचा जन्म

पुणे नागपूर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेस जोरदार प्रसूतीकळा सुरू झाल्या. गाडीचा या दरम्यान पहिला थांबा वर्धा स्थानकाचा होता. म्हणून तिला इथे उतरविण्यात आले.

baby born wardha railway station
धावत्या रेल्वेगाडीत प्रसूतीकळा, अखेर स्थानकावर बाळाचा जन्म (image – representational image/pixabay/loksatta graphics)

वर्धा : पुणे नागपूर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेस जोरदार प्रसूतीकळा सुरू झाल्या. गाडीचा या दरम्यान पहिला थांबा वर्धा स्थानकाचा होता. म्हणून तिला इथे उतरविण्यात आले. रेल्वे पोलिसांना सूचित केल्यावर त्यांच्या मदतीने महिलेस प्रतिक्षागृहात नेण्यात आले. रेल्वेचे डॉक्टर धावपळ करीत पोहोचले. इथेच प्रसूती झाली. मुलाचा जन्म झाला. आईने सुटकेचा निःश्वास टाकला.

हेही वाचा – वन शहीद दिन आणि जोधपूर किल्ल्याचा काय संबंध माहितीये? ११ सप्टेंबर १७३० ला जे घडले ते इतिहासात…

Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका
10 fast local trains on Central Railway from Dadar station towards Kalyan as per new schedule
मध्य रेल्वेवर दहा जलद लोकल, नव्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून कल्याणच्या दिशेने फेऱ्या
Dombivli railway station staircase
डोंबिवली रेल्वे स्थानकातील जिना तोडल्याने प्रवाशांची फरफट
trial of dedicated freight lane
पालघर : समर्पित मालवाहू मार्गीकेची चाचणी पूर्ण

हेही वाचा – समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना येथे मिळणार नि:शुल्क उपचार; जाणून घ्या योजनेबद्दल

प्रतिक्षागृहात आनंद पसरला. बाळासह आईस लगेच मग सामान्य रुग्णालयात पुढील देखरेखीसाठी पाठविण्यात आले. दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात येते. आई रत्नादेवी दयाला ही मूळ छत्तीसगड येथील असून नागपुरात भाड्याने राहते. पती पुणे येथे काम करीत असून नातेवाईकांसह गरोदर अवस्थेत ती प्रवासाला निघाली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Baby is born at wardha railway station pmd 64 ssb

First published on: 11-09-2023 at 16:33 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×