scorecardresearch

Premium

समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना येथे मिळणार नि:शुल्क उपचार; जाणून घ्या योजनेबद्दल

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वाहतुकीदरम्यान अपघातात जखमी होणाऱ्या रुग्णांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

Accident victims Samruddhi Highway
समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना येथे मिळणार नि:शुल्क उपचार; जाणून घ्या योजनेबद्दल (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

नागपूर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वाहतुकीदरम्यान अपघातात जखमी होणाऱ्या रुग्णांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत असून रुग्णांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केल्यास मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा – बुलढाणा : देऊळगाव राजा गांजा तस्करीचे केंद्र? तब्बल २४ किलो गांजा जप्त

solapur police commissioner marathi news, cp m rajkumar solapur marathi news
पोलीस आयुक्त एम. राजकुमारांनी डिजिटल फलकांची गर्दी हटविली, सोलापूरच्या सार्वजनिक सौंदर्याला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई
Gondia, Tragic Accident, Car Veers, Canal, Three Killed, Pangaon, Salekasa,
गोंदिया : भाविकांची अनियंत्रित कार कालव्यात कोसळली; तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू
28 villages, Land Acquisition, Virar Alibaug corridor, road, rate, Not Fixed,
विरार-अलिबाग बहुउद्देशिय मार्गिकेवरील २८ गावांचे दर अद्याप अनिश्चित
Anger among ST employees
भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युईटीचा भरणा न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष

हेही वाचा – वन शहीद दिन आणि जोधपूर किल्ल्याचा काय संबंध माहितीये? ११ सप्टेंबर १७३० ला जे घडले ते इतिहासात…

“लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्जित भव्य रुग्णालय असून येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत योजना) अनेक वर्षांपासून यशस्वीरीत्या कार्यरत असून रुग्णांना अविरत नि:शुल्क वैद्यकीय उपचार प्रदान केले जातात. राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह येथे समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना नि:शुल्क वैद्यकीय उपचार मिळणार असून चांगली सेवा प्रदान करण्यास रुग्णालय कटिबद्ध आहे”, असे डॉ. काजल मित्रा यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी जितेंद्र मुळे (९९२३०४१९०७) यांच्याशी संपर्क साधता येईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accident victims on samruddhi highway will get free treatment here learn about the scheme rbt 74 ssb

First published on: 11-09-2023 at 16:18 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×