अमरावती : येत्या सप्टेंबर महिन्यात तब्बल आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे ग्राहकांना पुढील नियोजन वेळेत करावे लागणार आहे. सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका आणि सहकारी बँका राष्ट्रीय सुट्यांच्या दिवशी बंद राहणार आहेत.

ग्राहकांना शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी संबंधित कामांचे आधीच नियोजन करावे लागणार आहे. मात्र, इंटरनेट बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा कार्यरत असल्‍याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दरम्‍यान, सण आणि उत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांना आता अचूक नियोजन करावे लागणार आहे.

हेही वाचा – बालविवाह प्रतिबंधक उपाययोजना नावापुरत्याच! पाच वर्षांत देशात ३,२५४, राज्यात १८५ प्रकरणे

हेही वाचा – रक्षाबंधन : जाणून घेऊया इतिहास, शास्त्र आणि महत्त्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा आहेत सुट्या

आगामी महिन्यात ३ सप्टेंबर रोजी रविवार, ९ सप्टेंबर दुसरा शनिवार, १० सप्टेंबर रविवार, १७ सप्टेंबर रविवार, १९ सप्टेंबर गणेश चतुर्थी, २३ सप्टेंबर चौथा शनिवार, २४ सप्टेंबर रविवार, २८ सप्टेंबर अनंत चतुर्दशी, ईद मिलाद अशा शासकीय सुट्या या महिन्यात आल्या आहेत.