राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त करोनाची वर्धक मात्रा (बुस्टर डोस) घेण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र नागपूर शहरात महापालिकेचे केंद्र वगळता फक्त चारच खासगी दवाखान्यात ही लस उपलब्ध आहे. त्यामुळे ६० वर्षाखालील नागरिकांची लस घेण्यासाठी पायपीट सुरू आहे. अजूनही २ लाख नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली नाही हे येथे उल्लेखनीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चौथी लाट तर येणार नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनही सजग झाले असून जिल्हाधिकारी विमला आर. आणि महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ज्येष्ठ नागरिक तसेच इतरही नागरिकांना करोना लस घेण्याचे आवाहन केले. पूर्वी वर्धक मात्रा नि:शुल्क दिली जात होती. आता ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱी यांनाच ती नि:शुल्क मिळते. इतरांना ती विकत घ्यावी लागते. ज्येष्ठ नागरिक सरकारी केंद्रावरून लस घेत आहेत, पण ६० वर्षाखालील नागरिकांसाठी केंद्र नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. महापालिकेने ३४ केंद्रांवर व चार खासगी दवाखान्यात वर्धक मात्रा देण्याची सोय केली. पण अनेक जण खासगी दवाखान्यांशी संपर्क साधून लसीबाबत विचारणा करतात. पण बहुतांश खासगी दवाखान्यात लस मिळतच नाही. त्यामुळे जास्तीत जास्त खासगी दवाखान्यात ही लस मिळावी, अशी मागणी आहे.

नागपूर शहरात लसीकरणाची जबाबदारी महापालिकेची तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेची आहे. शहरात महापालिकेच्या ३४ केंद्रांवर तर ग्रामीण भागात प्रत्येक प्राथिमक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात वर्धक मात्रा उपलब्ध आहेत. तेथे नागरिकांना लस दिली जात आहे, असे महापालिका व जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.

येथे उपलब्ध आहे वर्धक मात्रा

कोव्हिशिल्ड – १) अपोलो क्लिनिक, इमामवाडा २) आरएनएच रुग्णालय, धंतोली

कोवॅक्सिन – १) किंगस्वे हॉस्पिटल २) ऑरियस हॉस्पिटल

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Because of shortage of booster corona vaccine senior citizens face difficulties to get this in nagpur asj
First published on: 12-06-2022 at 20:04 IST