scorecardresearch

तब्बल पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून रशियातील शिकारी पक्षी पोचले नागपुरात

स्थलांतरित पक्ष्यांची संख्या यावर्षी रोडावली असली तरीही ‘पाईड हॅरिअर’ या शिकारी पक्ष्याने उपराजधानीतील पक्षी निरीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तब्बल पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून रशियातील शिकारी पक्षी पोचले नागपुरात

नागपूर : रशियातील पक्ष्यांनाही नागपूरच्या हवामानाने आकर्षित केले असून रशियातील अमूर व्हॅलीपासून सुमारे पाच हजार किलोमीटर अंतरावर उड्डाण करत त्यांनी नागपूर शहरात प्रवेश केला आहे. ‘पाईड हॅरिअर’ आणि ‘हॅरिअर’ प्रजातीतील पक्षी सध्या वर्धा रोडवर मुक्कामी आहेत.

स्थलांतरित पक्ष्यांची संख्या यावर्षी रोडावली असली तरीही ‘पाईड हॅरिअर’ या शिकारी पक्ष्याने उपराजधानीतील पक्षी निरीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शहरातील पाणथळ जागांवर दरवर्षी हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने देशविदेशातून स्थलांतरित पक्षी येतात. यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे या पाणथळ जागांवर स्थलांतरित पक्ष्यांसाठी फार अनुकूल परिस्थती नसल्याने त्यांची संख्या कमी आहे. मात्र, शहराभोवती तलाव, पाणवठे आणि गवताळ प्रदेशांना भेट देण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या शेकडो स्थलांतरित पक्ष्यांमध्ये ‘पाईड हॅरिअर’चे स्थान अभिमानास्पद आहे.

वर्धा रोडच्या आजूबाजूच्या परिसरात या पक्ष्यांनी त्यांचा मुक्काम ठोकला असून पक्षीनिरीक्षकांसाठी ते आकर्षण ठरले आहे. शिकारी पक्षी अशी ‘पाईड हॅरिअर’ची ओळख आहे. गवताळ आणि झाडीझुडपांचा परिसर या शिकारी पक्ष्यांसाठी उत्तम अधिवास समजला जातो. ड्रॅगनफ्लाय आणि कीटकांची ते शिकार करतात. यापूर्वी देखील जानेवारी २०२१ मध्ये ‘पाईड हॅरिअर’ ची नोंद झाली होती.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 12:32 IST

संबंधित बातम्या