अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणूक लढताना भाजपमधील अनेक नेत्यांचे समर्थन मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मला आशीर्वाद आहेत, असे वक्तव्य भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांनी केले. विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांच्यावर निष्क्रिय व भ्रष्टाचारी असल्याचा आरोपही देखील त्यांनी केला.

हेही वाचा >>>गडचिरोली पोलीस दलातील २९ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती ‘पोलीस शौर्य पदक’

अकोल्यात पत्रकार परिषदेत शरद झांबरेंनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी ते बोलत होते. डॉ. रणजीत पाटील यांनी पदवीधरांचा अपेक्षाभंग केला. त्यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात पदवीधरांचा कुठलाही प्रश्न सुटला नाही. पदवीधरांच्या समस्या वाढतच आहेत. डॉ. रणजीत पाटील यांचा कारभार देखील भ्रष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला. पुराव्यासह तो लवकरच जाहीर करू, असा इशारा देखील त्यांनी दिला. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदारसंघात किती तालुके आहेत, याची सुद्धा कल्पना नाही, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा >>>VIDEO: “धीरेंद्र महाराजांवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, कारण…”, नागपूर पोलीस आयुक्तांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदवीधर निवडणूक लढणे सोपे नाही. मला भाजपमधील अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. नावे जाहीर केले तर ते अडचणीत येतील. ही निवडणूक लढण्यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीसांचा मला आशीर्वाद मिळाला आहे, असा दावा देखील त्यांनी केला. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुका तोंडावर असताना फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना सुरू करणे शक्य नाही, असे म्हटले होते. यावरून सर्व समजून जावे, असे देखील झांबरे म्हणाले.