scorecardresearch

गडचिरोली पोलीस दलातील २९ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती ‘पोलीस शौर्य पदक’

नक्षल्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील २९ पोलीस अधिकारी व जवानांना राष्ट्रपतींकडून ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे.

गडचिरोली पोलीस दलातील २९ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती ‘पोलीस शौर्य पदक’
गडचिरोली पोलीस दलातील २९ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती 'पोलीस शौर्य पदक'

नक्षल्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील २९ पोलीस अधिकारी व जवानांना राष्ट्रपतींकडून ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. देशातील विविध पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व जवानांना प्रजासत्ताकदिनानिमित्त विविध पदके देण्यात येतात. यात राज्यातून गडचिरोलीतील सर्वाधिक जवानांचा समावेश आहे.

हेही वाचा >>>भंडारा : धक्कादायक ! अल्पवयीन मुलाचा ६ वर्षीय मुलीवर अत्याचार

नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दशकभरात पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. यादरम्यान नक्षल्यांच्या अनेक मोठ्या नेत्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले. तर अनेकांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होण्याच्या वाटेवर आहे. या कामगिरीत आपले योगदान देणाऱ्या २९ पोलीस अधिकारी व जवानांना यंदा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे.

हेही वाचा >>>मराठी साहित्य संमेलन आयोजकांची आर्थिक कोंडी, शासनाकडून अद्याप अनुदान नाही; तयारीची गती मंदावली

यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध यादीत औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, अमोल फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील बागल, राहुल नामदे, योगीराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव देशमुख, प्रेमकुमार दांडेकर, राहुल आव्हाड, देवाजी कोवासे, पोलीस हवालदार देवेंद्र आत्राम, राजेंद्र मडावी, नांगसू उसेंडी, सुभाष पदा, रामा कोवाची, प्रदीप भासारकर, दिनेश गावडे, एकनाथ सिडाम, प्रकाश नरोटे, शंकर पुंगाटी, गणेश डोहे, सुधाकर कोवाची, नंदेश्वर मडावी, भाउजी मडावी, शिवाजी उसेंडी, गंगाधर कराड, महेश मादेशी, स्वप्नील पदा या जवानांचा समावेश आहे. पदक प्राप्त अधिकारी व जवानांचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी अभिनंदन केले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 17:44 IST

संबंधित बातम्या