नागपूर : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) स्थानिक कार्यालयापुढे आंदोलन करताना काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती करणारी  भाजप आमदार कृष्णा खोपडे व सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी तांत्रिक कारणावरून फेटाळून लावल्या.

 यासंदर्भात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे या याचिका विचारात घेतल्या जाऊ शकत नाही,  अशा याचिकांवर निर्णय दिल्यास, प्रत्येकजण थेट उच्च न्यायालयात धाव घेईल व पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणाऱ्या तरतुदीला काहीच महत्व उरणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.  न्यायमूर्ती मनीष पितळे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.

पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका
candidate of Vanchit from Dhule Abdul Rehman demand for voluntary retirement but central government opposed it
वंचितच्या धुळे येथील उमेदवाराची स्वेच्छानिवृत्तीची मागणी, मागणीला केंद्र सरकारचा विरोध

काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी १४ जून २०२२ रोजी केंद्र सरकारविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयापुढे आंदोलन केले होते. दरम्यान, संबंधित नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह व अवमानजनक वक्तव्ये केली, असा दावा खोपडे यांनी त्यांच्या याचिकेत केला होता. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने उच्च न्यायालयात धाव  घेतली होती.