उद्धव ठाकरें आधी फेसबुक लाईव्ह करायचे. मुख्यमंत्रीपदी असताना अडीच वर्ष ते जनतेपर्यत पोहचलेच नाहीच. त्यामुळे त्यांच्याकडे शिल्लक असलेले कार्यकर्तेसुद्धादररोज शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. आता ठाकरेंना भीती वाटत आहे की, आपल्याकडे शिल्लक असलेले कार्यकर्ते पण राहणार नाहीत. म्हणून ते आता घराबाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहेत. फेसबुक लाईव्ह असं ऑनलाईन सोडून ते आता ऑफलाईन होऊ पाहत आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ .चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

हेही वाचा >>>अकोला: २६ वर्षांत २११७ हृदयरुग्णांना नवसंजीवनी; ‘लॉयन्स मिडटाऊन’चा पुढाकार

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
sangli lok sabha marathi news, sangli bjp lok sabha marathi news
सांगलीत विरोधकांमधील फूट भाजपच्या पथ्थ्यावरच
South Central Mumbai
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांत धुसफूस, शिवसेनेकडून प्रचार फेऱ्यांना सुरुवात
Bhavana Gawali
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?

ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात आले असताना माध्यमांशी बोलत होते.सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील ३ हजार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.पण उद्धव ठाकरे यांची यात्रा निघाली आहे ते त्यांचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या धनुषबाण मिळालेल्या शिवसेनेत जाऊ नयेत त्यांच्या पक्षातच थांबावे या करिता त्यांचा सर्व आटापिटा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षापूर्वी हिंदुत्वाचा विचार बाजूला सारून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली होती. बाळासाहेब यांना जी गोष्ट मान्य नव्हती ती त्यांनी केली. हे तत्व बाळासाहेबांनी आपल्या आयुष्यात कधी स्वीकारले नाही. केवळ स्वतः ला मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री होता यावं या अपेक्षेने त्यांनी हे केलं. हे करताना त्यानी सर्व सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा हा विचारच केला नाही. तो विचार बाळासाहेबांनी केला होता त्यामुळेच मनोहर जोशी, नारायण राणे सारखे कार्यकर्ते मुख्यमंत्री झाले.पण वेळ प्रसंगी आमच्या वरीष्ठ नेत्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांचा विचार चालविणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले. आज शिंदे- फडणवीस यांच्या नेतृतवात महाराष्ट्र पुढे जातो आहे याचा आम्हाला अभिमान असल्याचे बावनकुळे म्हणाले. या प्रसंगी खा.सुनील मेंढे , माजी मंत्री राजकुमार बडोले, परिणय फुके उपस्थित होते.