scorecardresearch

Premium

देशभरात भाजपचा जल्लोष; मेहकरात दोन गटात हाणामारी, चौघे जखमी

ज्येष्ठ भाजपा पदाधिकाऱ्यांना ही जबर मारहाण करण्यात आली.

BJP's election Mehkar taluka president fight two factions BJP itself
देशभरात भाजपचा जल्लोष; मेहकरात दोन गटात हाणामारी, चौघे जखमी (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

बुलढाणा: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा देशात जल्लोष सुरू असताना मेहकरात वेगळेच भीषण चित्र पाहायला मिळाले. भाजपाच्या मेहकर तालुका अध्यक्ष निवडीवरून भाजपाच्याच दोन गटात तुफान राडा झाला.

भाजपा पदाधिकाऱ्यांनी भाजपा विधानसभा संपर्क प्रमुखांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे वृत्त आहे. ज्येष्ठ भाजपा पदाधिकाऱ्यांना ही जबर मारहाण करण्यात आली.

Ramdas Tadas
वर्धा : भाजप खासदार रामदास तडस यांचे एक्स खाते हॅक, पोलिसांत तक्रार दाखल
Youth Congress officials pune
पुणे : पोलिसांकडून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड, भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा डाव फसला
pune gangsters interrogated at police commissionerate
पोलिसांनी पुण्यातील ‘भाईं’चा नक्षा उतरविला…गज्या मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळसह ३०० गुंडांची पोलीस आयु्क्तालयात चौकशी
mufti salman azhari
मुफ्ती सलमान अझहरी यांच्या अटकेविरोधात जमाव गोळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलिसांवर दगडफेक

हेही वाचा… तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाने माणिकराव ठाकरे यांचे राजकीय वजन वाढले

मारहाणीत चारजण गंभीर जखमी असून दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. आज मेहकर तालुका अध्यक्ष निवडणूक असल्याने दोन्ही भाजपाचेच गट पक्ष कार्यालयात समोरासमोर आले. एकाच तालुक्यासाठी दोन तालुकाध्यक्ष निवडल्याने वाद वाढला .

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjps election of mehkar taluka president caused a fight in two factions of bjp itself scm 61 dvr

First published on: 03-12-2023 at 15:51 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×