गडचिरोली: मार्कंडा वनपरिक्षेत्रात समाविष्ट असलेल्या रेंगेवाही उपक्षेत्रातील जंगल परिसरात २० जानेवारीला एका बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे मृत व्यक्तीचे धड आढळले असू असून शिर गायब आहे. त्यामुळे हा घातपात की वाघाचा बळी असा संभ्रम निर्माण झाला आहे. बापूजी नानाजी आत्राम ( ४५, रा. लोहारा ता. मूलचेरा) असे मृताचे नाव आहे. दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच याच परिसरातून दोन महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात आले होते.

जिल्ह्यात व्याघ्र हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ७ आणि १५ जानेवारी रोजी सुषमा देवदास मंडल(५५,रा. चिंतलपेठ), रमाबाई मुंजमकर ( ५५, रा. कोळसापूर) या दोन महिलांचा शेतात काम करताना वाघिणीच्या हल्ल्यात जीव गेला. तत्पूर्वी गडचिरोली तालुक्यातील वाकडी जंगलात ३ जानेवारी रोजी वाघाने एका महिलेला ठार केले होते.  वाघिणीला पकडण्यासाठी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ला पाचारण केले होते. १८ जानेवारी रोजी मध्यरात्री तिला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. याच जंगल परिसरातील रेंगेवाही उपवनक्षेत्रात २० जानेवारीला बापूजी आत्राम या बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी केवळ धड असून शिर गायब आहे, त्यामुळे व्याघ्रहल्ला व घातपात अशा दोन्ही बाजूंनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Video of tiger eating hidden prey in Navegaon buffer area
Video : ‘छोटा मटका’च्या वारसदाराने शिकार ठेवली लपवून, संधी मिळताच मारला ताव…
Centers Discrimination about onion export Know what is Farmers Association Onion Growers Allegation
कांदा निर्यातीबाबत केंद्राचा दुजाभाव? जाणून घ्या, शेतकरी संघटना, कांदा उत्पादकांचा आरोप
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!