नागरिकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागपूर जिल्हयात ग्रंथोत्सवाचे आयोजन ‍डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात होणार असल्याने ग्रंथरसिकांना विविध कार्यक्रमाची पर्वणी मिळणार आहे. ग्रंथोत्सवात कवी संमेलनासोबत परिसवांदाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.‍ विपीन इटनकर यांनी सांगितले.

हेही वाचा- मतदार नोंदणीसाठी ‘युथ फेस्टीवल’; निवडणूक आयोगाचा उपक्रम

दरवर्षी होणा-या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रयत्न केले जातात. त्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाते. यंदा फुटाळा येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. त्यासोबतच प्रकाशक व विक्रेते यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  नागपूर विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा- शिकवणी वर्गात जाणारा तुमचा मुलगा सुरक्षित आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी  वर्षासोबत शांताबाई शेळके, अण्णाभाऊ साठे, वसंत बापट, जी.ए. कुलकर्णी, कवी शंकर रमाणी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रंथोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.