नागपूर : दिवाळी आणि भाऊबिजेला बहीण घरी आली आणि बेरोजगार असलेल्या भावाकडे तिला ओवाळणीत टाकायला पैसे नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून एका भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मोठा इंदोरा परीसरात घडली. राहूल सोमकुवर (२९, मिसाळ ले आऊट, जरीपटका) असे मृत युवकाचे नाव आहे.

हेही वाचा – नागपूर शहरात घरफोड्या वाढल्या, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

police officer died after being hit by a car while rushing to help the injured
जखमीच्या मदतीसाठी सरसावताना मोटारीने ठोकरल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
In Nagpur a sister killed her brother after information about an immoral relationship
सख्खी बहीण पक्की वैरीण! प्रियकराला सुपारी देऊन भावाचा खून; अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने…
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

हेही वाचा – नागपूर: लोखंडी दरवाजा अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

जरीपटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल सोमकुवर हा बेरोजगार होता. तो कामाच्या शोधात गेल्या काही दिवसांपासून भटकत होता. मात्र, हाताला काम न मिळाल्यामुळे घरात दिवाळी सण साजरा झाला नाही. त्याचे त्याला दु:ख होते. दरम्यान, विवाहित असलेली बहीण दिवाळी आणि भाऊबीजेसाठी माहेरी आली. तिने भावाची ओवाळणी केली. ‘तुझ्या ओवाळणीच्या ताटात टाकयला माझ्या खिशात पैसे नाहीत. मला माफ कर’ असे म्हणत त्याच्या डोळ्यात अश्रू आले. बहिणीने त्याला सावरले आणि त्याची समजूत घातली. मात्र, ती बाब त्याला बोचत होती. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने घराच्या छतावर गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी उपनिरीक्षक संस्कृतायन यांनी सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.