बुलढाणा : मराठा आरक्षण व जालना लाठीमार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी इतर राजकीय पक्षाप्रमाणेच जिल्ह्यात चंचू प्रवेश करणारी भारत राष्ट्र समितीदेखील सरसावली आहे. पक्षाचे जिल्हा समन्वयक भैय्यासाहेब पाटील यांनी डोणगांव (तालुका मेहकर) येथे साखळी उपोषण सुरू केले आहे.

आंदोलनात अजय इंगळे रामराव शिंदे, राजू इंगळे, राजेंद्र लहाने, रमेश गायकवाड, बळीराम राठोड आदी सहभागी झाले आहेत. या उपोषणाला टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्यासह विविध संघटनांनी पाठींबा दिला आहे.

BRS on Maratha reservation
BRS on Maratha reservation

हेही वाचा – आमदार रोहित पवार… रोहित पाटील.. आणि नागपूरचे झणझणीत तर्री चणा पोहे; काय आहे वाचा…

हेही वाचा – नागपूर : ‘आरटीओ’कडून चार खासगी वाहन प्रशिक्षण केंद्रांवर कारवाई, काय आहे कारण जाणून घ्या…

समितीच्या या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणावर एक तोडगाही सुचविला आहे. तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मराठा समाजाला ‘बी कॅटिगिरी’अंतर्गत १२ टक्के आरक्षण दिले आहे. महाराष्ट्र राज्यातही याच धर्तीवर १८ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. त्यांना राज्य सरकारला हा तोडगा सुचविला आहे.