लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्र व राज्य शासनाकडून ग्राहकांना वेळेवर वीज देयक भरण्याचे वेळोवेळी आवाहन केले जाते. त्यानंतरही विदर्भातील अकरा जिल्ह्यांची स्थिती बघितली तर बुलढाणा आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये उच्च आणि लघु दाब संवर्गातील ग्राहकांवर सर्वाधिक थकबाकी असल्याचे पुढे आले आहे.

Decrease in water storage in dams compared to last year
नागपूर : गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठ्यात घट
heatwave in mumbai and thane mumbai
मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?

महावितरणच्या २६ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या अहवालानुसार, उच्च आणि लघु दाब संवर्गातील विदर्भातील सर्वाधिक थकबाकी बुलढाणा जिल्ह्यात आहे. या थकबाकीमध्ये पथदिवे, पाणीपुरवठा आणि कृषी संवर्गातील थकबाकीचा समावेश नाही. बुलढाण्यात उच्च आणि लघु दाब संवर्गात ४७.६ कोटींची थकबाकी आहे. नागपूरच्या शहरी भागात ४६.२१ कोटी, नागपूर ग्रामीणला ६.५६ कोटींची थकबाकी आहे.

आणखी वाचा-…तर ओबीसी महाराष्ट्रात पेटून उठेल, खासदार रामदास तडस म्हणाले, “जातीनिहाय जनगणना…”

अकोला जिल्ह्यात १५.९९ कोटी, वाशिममध्ये १०.२६ कोटी, अमरावतीमध्ये १२.२५ कोटी, यवतमाळमध्ये २८.८८ कोटी, चंद्रपूरमध्ये ३.३७ कोटी, गडचिरोलीमध्ये २.१६ कोटी, भंडारामध्ये १.४५ कोटी, गोंदियामध्ये ८.१७ कोटी, वर्धेत ९५ लाख रुपये उच्च व लघू संवर्गातील ग्राहकांकडे थकबाकी आहे. उच्च दाब थकबाकीमध्ये उद्योग आणि मॉल्स संवर्गातील मोठे ग्राहक आणि लघु दाब संवर्गातील ग्राहकांमध्ये घरगुती, व्यवसायिक आणि उद्योग या तिन्ही संवर्गातील ग्राहकांचा समावेश आहे. या विषयावर महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर म्हणाले, महावितरणकडून सातत्याने वीज देयक वसुलीबाबत सर्वत्र मोहिम राबवण्यासह नागरिकांनाही देयक भरण्याचे आवाहन केले जाते. ग्राहकांना सुट्टीच्या दिवशी रविवारीही देयक भरण्याची सध्या सोय करण्यात आली आहे.