scorecardresearch

Premium

बुलढाणा : कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे ५३ लाख थकवले, उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाचे विभागीय कार्यालयच सील केले…

कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे उपदान देण्यास अक्षम्य टाळाटाळ केल्याने एसटी महामंडळाचे बुलढाणा विभागीय कार्यालय आज, गुरुवारी संध्याकाळी उशिरा ‘सील’ करण्यात आले.

Buldhana Divisional Office of ST
एसटी महामंडळ, बुलढाणा विभागीय कार्यालय सील (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

बुलढाणा : कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे उपदान देण्यास अक्षम्य टाळाटाळ केल्याने एसटी महामंडळाचे बुलढाणा विभागीय कार्यालय आज, गुरुवारी संध्याकाळी उशिरा ‘सील’ करण्यात आले. यानंतरही महामंडळ ताळ्यावर आले नाही तर, कार्यलयाच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याने महामंडळाचे मुख्यालय हादरले आहे.

हेही वाचा – राष्ट्रपती दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर, काय आहेत कार्यक्रम?

Clear way for examination of 12th answer sheet Boycott withdrawn after discussions with Education Minister
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा; शिक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर बहिष्कार मागे
Transfer of 40 people including police inspector in traffic cell in case of extortion in Shilpata
शिळफाटा येथील वसूलीप्रकरणी वाहतुक कक्षातील पोलीस निरीक्षकासह ४० जणांची बदली
Transfer of 120 officers and employees in navi mumbai municipal corporation
नवी मुंबई : महापालिकेत १२० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या
residents visited former corporators office and felicitated for action taken against unauthorized buildings
नवी मुंबई : शिवसेना उपशहरप्रमुख यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी, वाचा नेमकं काय घडलं…

हेही वाचा – यवतमाळ : सत्ताधारी गांजा पिऊन नुकसानीची पाहणी करतात का? शेतकऱ्यांच्या ‘सोटा’ मोर्चात….

१९ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे तब्बल ५३ लाख रुपये महामंडळाकडे थकीत आहे. उच्च न्यायालयाने मागील २५ सप्टेंबर रोजी रक्कम अदा करण्याचे आदेश पारित केले होते. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही महामंडळाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे त्यांची जमीन जप्त करून आज शासनाच्या नावे करण्यात आली. तसेच तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने मलकापूर मार्गावरील विभागीय कार्यालय सील केले. उद्या, शुक्रवारपर्यंत धनादेश दिला नाही तर जप्त जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मुख्यालय प्रशासन व बुलढाणा विभाग हादरला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Buldhana divisional office of st corporation was sealed scm 61 ssb

First published on: 30-11-2023 at 20:14 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×