बुलढाणा : दमदार पावसाने जिल्ह्यातील ५१ सिंचन प्रकल्प पैकी बहुतांश प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. सध्या पाच धरणातून विसर्ग सुरु असून नदीकाठच्या शेकडो गावांना पुराचा धोका असल्याने सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात ३ बृहत( मोठे), ७ मध्यम आणि ४१ लघु सिंचन प्रकल्प आहेत. आजअखेर खडकपूर्णा धरणात ८७. ८७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही नजीकच्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे धरणाचे ७ दरवाजे सुरु करण्यात आले असून त्यातून ४७८ क्यूबिक मीटर प्रति सेकण्ड इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. परिणामी, नदीकाठच्या ३३ गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. या गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी यासह हजारो गावाकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मेहकर तालुक्यातील पेनटाकळी या मोठ्या प्रकल्पत देखील ८३. ५४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे काल सोमवारी धरणाचे सातही
लंपीचा बैलपोळ्यालाही फटका
बुलढाणा : जिल्ह्यामध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव असल्याने प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. यामुळे विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे.
यापाठोपाठ आता याचा फटका शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण असलेल्या पोळा या सणाला देखील बसला आहे. येत्या २२ ऑगस्ट रोजीचा बैलपोळा सण साधा व घरगुती पद्धतीनेच साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधिसूचना जारी करण्यात आली असून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व विभागांना प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २२ ऑगस्ट रोजी बैलपोळा सण साजरा होणार आहे. या दिवशी बैल एकत्र करून सण साजरा केल्यास किंवा शर्यतींचे आयोजन झाल्यास लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर सर्व पशुपालकांनी साध्या पद्धतीने सण साजरा करावा,अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच हा अनुसूचित रोग आहे. यामुळे प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शासकीय, निमशासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कार्यवाहीत दिरंगाई आढळल्यास अधिनियम २००९ मधील कलम ३१, ३२ व ३३ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील देऊळगाव राजा, मलकापूर, सिंदखेड राजा, खामगाव आणि चिखली या पाच तालुक्यातील गावांमध्ये हा आजार फैलावला. यानंतर जवळपास जिल्ह्यात प्रसार झाला. पशुसंवर्धन रोग व अन्वेषण सह आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून या जनावरांना लंपीची लागण झाल्यावर शिक्का मोर्तब झाले. जिल्ह्यात आजअखेर ७६२ जनावरांना रोगाची लागण झाली आहे. त्यातील ३२ गोवंश जनावरे दगावली आहे. गंभीर जनावरांवर उपचार सुरू आहे. त्यामुळे त्या परिसरापासून दहा किलोमीटरच क्षेत्र बाधित व निगराणी क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केले आहे. गाई, यासारख्या जनावरांची वाहतूक किंवा स्थलांतरण करण्यास,नियंत्रित क्षेत्रातून बाहेर नेण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात गोवंश वर्गातील पशुची संख्या ३ लाख ६० हजार इतकी आहे. यामुळे आजाराचा धोका गंभीर असल्याचे चित्र आहे.