बुलढाणा शहरात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांस परीक्षेत कमी गुण मिळाले. त्यामुळे संतापलेल्या आईने मुलाला चक्क गरम चटके दिले व घराबाहेर काढले. यानंतर मुलाने थेट पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतापाच्या भरात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. बुलढाण्यात विद्यार्थ्याला कमी गुण मिळाल्याने आई व मुलामध्ये संघर्ष होऊन हा वाद पोलीस ठाण्यात गेला. शाळेतील सराव परीक्षेत विद्यार्थ्याला कमी गुण मिळाले, मात्र जास्त गुण मिळाल्याचे मुलाने घरी खोटे सांगितले. गुण कमी मिळाल्याचे समजल्यानंतर विद्यार्थ्याच्या आईने त्याला गरम चटके दिले. शाळेतील पालकसभेनंतर घरी पोहोचल्यावर आईने घराबाहेर काढल्याचे मुलाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्याने घडलेला प्रकार अगोदर मित्राच्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर हे प्रकरण बालकल्याण समितीकडे गेले. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरुन त्याच्या आईविरुद्ध बाल संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलावर उपचार करून त्याला समितीच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.