बुलढाणा : चिखली शहरात वाहतूक पोलिसांकडून परराज्यातील वाहनचालककडून जबरदस्तीने पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील ५ पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणातील पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना एका आदेशान्वये निलंबित केले. या कडक कार्यवाहीने जिल्ह्यातील पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. तसेच खाबुगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्याना कडक संदेश देण्यात आला आहे.

पोलीस कर्मचारी अभय टेकाळे (चिखली पोलीस स्टेशन), गजानन भंडारी (जिल्हा वाहतूक शाखा) तसेच महामार्ग पोलीस कर्मचारी विठ्ठल काळुसे, विजय आंधळे आणि संदीप किरके यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या घटनेला गंभीरतेने घेत एका आदेशान्वये या खंडणी प्रकरणातील पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली.

कर्नाटक राज्यातील चल्लकेरे येथील ताज अब्दुल रहमान (वय २३ वर्ष )हे अकिब अरमान,शेख इब्राहीम आणि जुबेर अहमद या सहकाऱ्यांसह एका कारने ५ ऑगस्ट रोजी मलकापूरकडे जातं होते.या दरम्यान चिखली – बुलढाणा मार्गावर चिखली पोलिस ठाण्यातील १ आणि जिल्हा वाहतूक शाखेतील १ मिळून २ पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले.वाहनाची कागदपत्रे तपासल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दीड हजार रुपयांची मागणी केली.

त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने जवळच्या एका चहा विक्रेत्याच्या क्यूआर कोडवर १५०० रुपये दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.मात्र काही अंतरावर पुन्हा महामार्ग पोलीसच्या ३ कर्मचाऱ्यांनी त्यांचे वाहन अडवून,वाहनात असलेल्या एअर रायफलमुळे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी २ लाख रुपयांची खंडणी मागितली.तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजार रुपयांवर आली व ती देखील ऑनलाईन भरण्याचे आदेश दिले. या ३ पोलिसांवर संशय आल्याने ताज रहमान यांनी वाहन घेऊन निघण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांची कार उलटल्याने ते जखमी झाले. या प्रकरनाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलाहिजा न करता गुन्हे दाखल करण्याचे आदेश बजा