बुलढाणा: बातमीचे शीर्षक गोंधळून टाकणारे आहे हे नक्कीच! काहींना अविसश्वनीय वाटणारे देखील असू शकते.एखादा ट्रक पोलिसांची कशी गोची कारू शकतो? असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो.पण हे सत्य आहे. हे सर्व एका अपघातामुळे घडलं आहे.
बुलडाणा ते मलकापूर राज्य महामार्गावरील राजूर घाटात देवीच्या मंदिरा जवळील वळणावर एक मालवाहू ट्रक उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र मजेशीर बाब अशी की हा अपघात दोन पोलीस ठाण्याच्या ठाण्याच्या अगदी सीमा रेषेवर झाला आहे. ट्रक उलटल्याने ट्रकची कॅबिन ( चालक कक्ष) बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे तर बॉडी (मागील भाग) बुलडाणा शहर ठाण्याच्या हद्दीत आहे.
दोन्ही ठाणे हद्धच्या ज्या संगम रेषेवर (ठिकाणी )अपघात झाला त्याच्या बाजूलाच ठाणेच्या हद्दीचा बोर्ड लागलेला आहे, हे विशेष.त्यामुळे अपघात कोणत्या पोलीस ठाणे हद्धीमध्ये?, बुलढाणा शहर की बोराखेडी पोलीस ठाणे हद्धीमध्ये असा प्रश्न या अपघातग्रस्त ट्रक मूळे उपस्थित झाला. तसेच घटनेचा तपास कोण करणार? हा पूरक प्रश्न ओघाने आलाच, प्राप्त माहितीनुसार बुलडाणाकडून कापसाच्या गठी घेऊन एक ट्रक मलकापूरच्या दिशेने दुपारच्या सुमारास जात होता.
यावेळी अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळच्या वळणावर घाट उतरत होता. नेमके याच वेळी ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक डाव्या बाजूला उलटला. या घटनेमुळे राजूर घाटात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाता प्रकरणी गुन्हा कोणत्या ठाण्यात दाखल होतो याकडे वाहन धारक, नागरिकांचे आणि सर्वांचेच लक्ष लागले आहे..