नागपूर : पुण्याच्या उद्योगात दादागिरी पाहायला मिळते. विविध पक्षाचे लोक त्या पक्षाचे नाव घेऊन दादागिरी करतात, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.नागपुरात दिव्या देशमुख हिचा शनिवारी सत्कार समारंभानंतर माध्यमांशी फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, चांगली गोष्ट आहे, दादागिरीच्या प्रश्नावर सर्व नेत्यांना एकमत करावा लागेल. कारण खूप मोठ्या प्रमाणात पुण्याच्या उद्योगात दादागिरी पाहायला मिळते आहे. मी तर ही दादागिरी मोडून काढणारच आहे.
महाराष्ट्रात मराठी शिकलीच पाहिजे. ती अनिवार्य आपण केलीच आहे. पण महाराष्ट्रातील मराठी मुलांना मराठी सोबत आणखी एक भारतीय भाषा शिकायला मिळाली, तर त्यात काय वावगे आहे? आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेला पायघड्या घालायच्या मानसिकतेला माझा विरोध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपुरात दिव्या देशमुख हिचा शनिवारी सत्कार समारंभानंतर माध्यमांशी फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, पुण्याच्या उद्योगात दादागिरी पाहायला मिळते आहे. मी तर ही दादागिरी मोडून काढणारच आहे. राज ठाकरेच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, त्यांच्याकरिता कायदा बनलाच नाही. तुम्ही शहरी नक्षल सारखे वागाल तर तुम्हाला अटक होईल. तुम्ही शहरी नक्षल सारखे वागत नाही तर तुम्हाला अटक करण्याचे कारण नाही. जे लोक कायद्याच्या विरोधात आहेत त्यांच्या करिता नवीन कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात कायदा नाही. सरकारच्या विरोधात बोलण्याची मुभा आहे, त्यामुळे मला असे वाटते जे वक्तव्य आहे. ते हा नवीन कायदा न वाचता केलेले वक्तव्य असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
दिव्या देशमुखकडून भारताला खूप अपेक्षा – मुख्यमंत्री
दिव्या देशमुखने भारताचे नाव जागतिक स्तरावर नेलाय आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे आणि म्हणूनच आज आज तिचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिक सत्कार केला. तीन कोटी रुपये पुरस्कार शासनाने दिला आहे. केवळ एकोणीस वर्षाची कन्या जिने भारताची पहिली ग्रँडमास्टर महिला म्हणून जिंकली आहे आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये तिच्याकडून भारताला खूप अपेक्षा आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ती भारताचे नाव उंच करेल, आतापर्यंत बुद्धिबळामध्ये चीनच्या महिलांचं वर्चस्व होतं मात्र यावेळी अंतीम स्पर्धेत दोन्ही स्पर्धक या भारताच्या पोहोचल्या. नागपूरकर असलेल्या दिव्याचा महाराष्ट्र सरकारने तिचा सन्मान केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.