लोकसत्ता टीम

अकोला : राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासंदर्भातील चर्चा सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नसून उद्धव ठाकरेंच्या संघटनेने तर राम राज्याची संकल्पना अगोदरच सोडून दिली, असा टोला देखील त्यांनी लगावला.

Clean cheat, Ajit Pawar, code of conduct,
अजित पवारांना ‘क्लिन चीट’, ‘कचाकचा बटन दाबा’ वक्तव्य; आचारसंहिता भंगची तक्रार फेटाळली
lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
Nominate BJP for Dharashiv Delegation demands to Devendra Fadnavis
धाराशिवसाठी भाजपालाच उमेदवारी द्या! शिष्टमंडळाची फडणवीस यांच्याकडे मागणी

अकोल्यात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू होणाऱ्या घटना गांभीर्याने घेतल्या पाहिजे. या प्रकारच्या संवेदनशील घटनांचे राजकारण न करता अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तीच राज्य शासनाची भूमिका आहे.’

आणखी वाचा-उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमापूर्वी शिवसैनिक स्थानबद्ध; आमदार नितीन देशमुख म्हणाले, “वरती हप्ते…”

रामराज्यासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या विधानावर त्यांना विचारले असता, ‘संजय राऊतांना मी कधीच उत्तर देत नाही. कारण उत्तर देण्याच्या लायकीचे ते नाहीत. ते काहीही बोलतात. मात्र, एका गोष्टीचा आनंद आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना रामराज्य मानते. रामराज्याची संकल्पना तर त्यांनी केव्हाच सोडली आहे,’ असा आरोप त्यांनी केला. बच्चू कडू नाराज असल्याच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भाष्य केले. स्थानिक एखादी घटना घडली तर संपूर्ण भाजपवर त्याचे खापर फोडणे योग्य नाही. शेवटी बच्चू कडू आमचे सहकारी आहेत. दोन्ही बाजूने मैत्रीचा धर्म निभावला पाहिजे. मी स्वत: त्यांच्याशी चर्चा करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.