बुलढाणा : राज्यभरात होणाऱ्या तलाठी पदाच्या भरतीत दिव्यांग उमेदवारांना ‘हमीपत्र’ द्यावे लागणार आहे. हे लिखित पत्र दिल्यावरच पात्र दिव्यांग उमेदवारांना विविध सुविधा मिळणार आहेत.

आजपासून भरतीला सुरुवात झाली असून १७ सप्टेंबरपर्यंत ३ टप्पांत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दिव्यांग उमेदवारांना लेखी परीक्षेपूर्वी लेखी हमीपत्र देणे आवश्यक आहे. त्यासाठी संबधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना शाखेत कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांनी अपंगत्व प्रमाणपत्र दिलेल्या दिव्यांग उमेदवारांना निर्धारित नमुन्यातील अर्ज या कक्षात सादर करावा लागत आहे.

हेही वाचा – सना खान हत्याकांडात म. प्र. भाजपा नेत्याचा हात, आई मेहरुनिसा खानचा आरोप

हेही वाचा – भंडारा जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून युवकाला मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कशाची हमी?

या पत्रात उमेदवारांना आपल्यासोबतच त्यांनी सुचविलेल्या लेखनिकचा तपशील आणि फोटो जोडणे बंधनकारक आहे. तसेच लेखनिक उमेदवारापेक्षा कमी शिक्षित (एक परीक्षा कमी उत्तीर्ण) असल्याची हमी द्यावयाची आहे. सुचविलेला लेखनिक व अन्य माहिती चुकीची आढळून आली तर कारवाई होणार याची कल्पना असल्याचे हमीपत्राच्या अंती नमूद आहे. पात्र दिव्यांग उमेदवारांना २०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी लेखनिक देण्यात येणार आहे. तसेच जादाची वेळ (अनुग्रह वेळ) देण्यात येणार आहे. सामान्य उमेदवारासाठी तलाठी परीक्षेची वेळ २ तास आहे. मात्र दिव्यांगाना एक तासामागे २० मिनिटे जादा मिळणार असल्याचे वरिष्ठ प्रसाशकीय सूत्रांनी सांगितले.