वर्धा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू विरहीत वर्धा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ २२ जुलै रोजी होणार आहे. शुभारंभाप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मंत्री उपस्थित राहणार असून त्याअनुषंगाने पालकमंत्री डॉ. भोयर यांनी चरखागृह येथे भेट देऊन तयारीची पाहणी केली. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये अभियानांतर्गत मोतिबिंदू, दंतरोग व अन्य आजाराच्या रुग्णांची तपासणी करुन मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ व वर्धा तालुकास्तरीय शिबिर चरखागृह येथे दि.२२ जुलै रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री व अन्य काही मंत्री उपस्थित राहणार आहे. चरखागृह येथे शिबिरस्थळी एकून ७३ स्टाॅल आरोग्य विभागाच्यावतीने उभारण्यात येत आहे. पावसाचे सावट असल्याने त्यादृष्टीने तयारी केल्या जात आहे. पालकमंत्री डॉ पंकज राजेश भोयर यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम व उद्घाटन सेनेचे शिंदे, ही देखील चर्चेची बाब ठरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री असलेले शिंदे हे वर्ध्यात येत आहे म्हणून निष्ठावंत शिवसैनिक उत्साहात आहेत. बंडखोरीनंतर बरेच पाणी वाहून गेले आहे. अनेकवार सेनेची पडझड झाली पण माजी जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे हे मात्र ठाकरे परिवाराशीच जुळून राहले. हीच खरी सेना, असे ते सांगत. पण मग त्यांचा हिरमोड होत गेला. मातोश्रीवर साधी भेट होणे दुरापास्त होत गेले. अन्य नेते दुरावलेले. जे जे ज्येष्ठ नेते बालपांडे यांना जवळून ओळखत ते ठाकरे सेनेत राहले नाही. म्हणून मग अधिकच कोंडमारा होत गेल्याचे बालपांडे गट सांगतो. मग अखेर शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय झाला. मध्यंतरी मंत्री प्रताप सरनाईक हे वर्ध्यात एका कार्यक्रमास आले असतांना बालपांडे त्यांना भेटले. सरनाईक यांचे पहिलेच वाक्य होते, का इतका वेळ लावला. पण शिंदे गटात येण्यापूर्वी बालपांडे यांच्या काही अटी होत्या. त्या श्रीकांत शिंदे यांनी मान्य केल्या. जिल्हाप्रमुखपद देवू केले. पण ते नाकारत केवळ लोकसभा क्षेत्रप्रमुख हेच पद स्वीकारले. तसेच बाळा शहागडकर व राजेश सराफ यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करवून घेतली. बालपांडे म्हणतात एकत्र शिवसेनेत शिंदे व अन्य नेत्यांशी जवळीक होतीच. आता ते वर्ध्यात येत आहे म्हणून भेट घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसा निरोप दिला आहे. मात्र पूर्णतः शासकीय कार्यक्रम असल्याने भेट कशी जुळेल हे आता सांगता येणार नाही. भेट झाली तर उत्तमच.