महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाचा समावेश

नागपूर : भारतातील १४ व्याघ्रप्रकल्पांना कॅट्स (कन्झर्वेशन अश्युअर्ड टायगर स्टँडर्ड)ची मान्यता मिळाली असून यात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाचा समावेश आहे. जागतिक व्याघ्र दिनी महाराष्ट्राला ही सुखद भेट मिळाली आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि व्याघ्र संवर्धनाच्या लक्ष्याचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून ही प्रक्रिया वापरली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅ ट्स हे जागतिक पातळीवर स्वीकारले जाणारे संवर्धनाचे मानक आहे. भारतात कॅ ट्सच्या मूल्यांकनासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला ग्लोबल टायगर फोरम आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया सहकार्य करतात. ‘कॅ ट्स-लॉग’ या सॉफ्टवेअरचा वापर करून दृश्य आणि क्षेत्रावर आधारित व्याघ्रसंवर्धनाचा मागोवा घेण्यात आला. या सॉफ्टवेअरचा वापर करून पहिल्यांदा क्षेत्रीय मूल्यांकन करण्यात आले. जागतिक पातळीवर ही प्रक्रि या रूढ करणारा भारत हा पहिला देश ठरला. वाघांच्या  लोकसंख्येला आधार देणारा अधिवास हा व्याघ्रसंवर्धनातील मुख्य घटक आहे. वाघांच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी त्याचे प्रभावी व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. वाघांचा अधिवास असणाऱ्या सात देशात ही मूल्यांकनाची प्रक्रि या सुरू असून त्यातील सर्वाधिक क्षेत्र भारतात आहे. यावर्षी २० व्याघ्रप्रकल्पात मूल्यांकन करण्यात आले असून त्यातील १४ व्याघ्रप्रकल्पांना कॅ ट्सची मान्यता देण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाचा समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cats approves 14 tiger projects in india zws
First published on: 30-07-2021 at 01:31 IST