लोकसत्ता टीम

नागपूर: मध्य भारतातील पाहिले मधुमेह तज्ज्ञ, नागपुरातील ड्रीम ट्रस्टचे संस्थापक आणि रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडियाचे सक्रिय सदस्य डॉ. शरद पेंडसे यांचे बुधवारी (१४ जून) सकाळी निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.

नागपुरातील धंतोली येथील रहिवासी असलेले डॉ. शरद पेंडसे सांचे अंत्यसंस्कार बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता मोक्षधम घाट येथे करण्यात येणार आहे. डॉ. शरद पेंडसे मध्य भारतातील पहिले मधुमेह तज्ज्ञ होते. त्यांनी १९९७ मध्ये स्थापन केलेली नागपुरातील ड्रीम ट्रस्ट ही संस्था आता २६ वर्षांत आहे. या संस्थेंतर्गत टाईप- १ मध्ये असलेल्या रुग्णांना मोफत इन्सुलिन दिले जाते. या संस्थेकडे विदर्भातील दोन हजारावर रुग्णांची नोंदणी आहे. ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे, अशा मुलांसाठीच ही संस्था सेवा देते. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून रुग्ण येथे येऊन नियमितपणे इन्सुलिन प्राप्त करून घेतात. करोना काळातील ताळेबंदीतही डॉ. पेंडसे यांनी संस्थेच्या मदतीने गरीब मधुमेह ग्रस्तांना इन्सुलिन आणि इतरही उपचार व औषधीबाबत मदत केली होती.

आणखी वाचा-बुलढाणा: एक, दोन नव्हेतर महिलेने दिला चक्क तिळ्यांना जन्म!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरातील धंतोलीमध्ये या ट्रस्टचे काम डॉ. पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते. या ट्रस्टकडून गरिबांना सायकल वाटपसह इतरही बरेच उपक्रम राबवले जात असल्याचे, जेष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी सांगितले.