वेकोलिच्या खाणीलगत असलेल्या घुग्घुस येथील अमराई वार्डा त भूस्खलन झाल्याने गजानन मडावी यांचे संपूर्ण घर कोसळले. घर कोसळताच तेथे १०० फूट खड्डा झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली.

या भागात वेकोलिच्या खाणी असून असंख्य घरे आहेत. सायंकाळच्या सुमारास मडावी यांचे घर अचानक हलायला लागले. भीतीमुळे ते घराच्या बाहेर आले, त्यानंतर काही वेळातच त्यांचे घर पत्त्यासारखे कोसळले. वेकोलिने जमिनीतून कोळसा काढल्यानंतर निर्माण झालेल्या पोकळीत रेती भरायला हवी होती. मात्र ती भरल्या गेली नाही. त्यामुळेच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. यात वेकोली अधिकारी व कंत्राटदार याची चूक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवळपासचा परिसर रिकामा करण्याचे निर्देश –

तर, पाहणीदरम्यान आमदार जोरगेवार यांनी जवळपासचा परिसर रिकामा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. येथील नागरिकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करा. परिसरात पोलीस बंदोबस्त लावा आणि वीज पुरवठा खंडित करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.